धाडशी मुलगा मराठी गोष्ट DHADASHI MULAGA - MARATHI STORY

DHADASHI MULAGA - MARATHI STORY मित्रांनो आम्ही आज तुमच्यासाठी एक छान गोष्ट घेऊन आलो आहे. ही गोष्ट एका शाळेत जाणाऱ्या धाडशी मुलाची आहे. मित्रांनो तुम्ही नक्की पूर्ण गोष्ट वाचून घ्या. या गोष्टीतून खूप प्रेरण मिळेल. मित्रांनो तुम्हाला ही गोष्ट नक्की आवडेल अशी आशा करून चला गोष्टीला सुरुवात करूया.

DHADASHI MULAGA - MARATHI STORY



DHADASHI MULAGA - MARATHI STORY

DHADASHI MULAGA - MARATHI STORY


    एक मुलगा काशीत हरिश्चंद्र हायस्कूल मध्ये शिकत होता. त्याचे गाव काशीहून आठ मैल दूर होते. तो दररोज तेथून पायी चालत येत असे आणि रसत्यात जी गंगा नदी वाहते ती पार करून शाळेत जात असे. त्या काळी गंगा पार करण्यासाठी नावाड्याला दोन पैसे द्यावे लागत असत.दोन पैसे येण्याचे दोन पैसे जाण्याचे, एकून चार पैसे म्हणजे पूर्वीचा एक आणा. महिन्याचे जवळ जवळ दोन रुपये झाले. जेव्हा एक तोळा सोन्याचा भाव शंम्भर रुपयांपेक्षाही कमी होता. तेव्हाचे दोन रुपये ! आत्ताचे तर पंचविस रुपये होतील. त्या मुलाने  आपल्या आई-वडिलांवर जास्त भार पडू नये म्हणून एक पैसा सुद्धा आई वडिलांकडे मागितला नाही."DHADASHI MULAGA - MARATHI STORY"


DHADASHI MULAGA - MARATHI STORY

DHADASHI MULAGA - MARATHI STORY


    त्याने पोहणे शिकून घेतले. उन्हाळा असो, पावसाळा असो कि हिवाळा असो, पोहून गंगा पार करून शाळेमध्ये जाने, हा त्याचा दिनक्रम झाला. अशा प्रकारे कितीतरी महिने निघून गेले. एकदा पौष महिण्याच्या थंडीत या मुलाने सकाळी शाळेत जाण्यासाठी गंगेत उडी मारली. पोहत-पोहत तो नदीच्या मध्यभागी आला एका नावेत यात्रेकरू नदी पार करीत होते. त्यानी पाहिले की लहानसा मुलगा आता बुडून मरेल. ते त्याच्या जवळ नाव घेऊन गेले आणि हात पकडून त्यला नावेत खेचून घेतले. त्या मुलाच्या चेहऱ्यावर भीती किंवा चिंतेची छटा अजिबात नव्हती. सर्व लोक आश्यर्यचकित झाले. इतका लहान आहे आणि इतका धाडसी? ते म्हणाले ," तु आता बुडून मेला असता तर? असे धाडस करू नये." तेव्हा तो मुलगा म्हणाला ," धाडस तर केलेच पाहिजे . जीवनात अनेक अडचणी-संकटे येतील. त्यांना पायदळी तुडवण्यासाठी धाडस तर  पाहिजेच! जर आत्तापासून धाडस अंगी बाणले नाही, तर जीवनात मोठमोठी कार्ये कशी करू शकेन?" "DHADASHI MULAGA - MARATHI STORY"


DHADASHI MULAGA - MARATHI STORY

    

DHADASHI MULAGA - MARATHI STORY

    लोकांनी विचारले,"ह्यावेळी पोहायला कशाला निघालास? दुपारी आंघोळीला आला असतास ?"मुलाने उत्तर दिले ,"मी आंघोळ करण्यासाठी नदीत उतरलो नाही. मी तर शाळेत चाललो आहे ."होडीत बसून गेला असतास!" "रोजचे चार पैसे येण्या-जाण्यासाठी लागतात. माझ्या गरीब आईवडिलांवर मला भार टाकायचा नाही. मला तर स्वतःच्या पायांवर उभे राहायचे आहे. माझा खर्च वाढला तर आई-वडिलांची चिंता वाढेल त्यांना घर चालवणे कठीण होऊन जाईल ."लोक त्याच्याकडे आदराने पाहतच राहिले. तोच धाडशी मुलगा पुढे भारताचा पंतप्रधान बनला. तो मुलगा कोण होता माहीत आहे?ते होते लालबहादूर शास्त्री! शास्त्रीजी पदावर सुद्धा सत्यता, धाडस, सरळपणा,प्रामाणिकपणा,साधेपणा,देशप्रेम ई. सदगुण आणि सदाचाराचे मूर्तिमंत स्वरूप होते. असे महापुरुष भले थोडा काळच राज्य करतात, पण एक प्रभाव जनमानसावर पाडून जातात! 

 

बोध- कोणतेही काम हिम्मत व धाडसाने करा ते निश्चित पूर्ण होते. "DHADASHI MULAGA - MARATHI STORY"

 मित्रांनो तुम्हाला जर "DHADASHI MULAGA - MARATHI STORY" ही मैत्रीवरची गोष्ट/कथा आवडली असेल तर नक्की शेअर करा. आणि कशी वाटली गोष्ट कमेंट मध्ये नक्की कळवा.

   

आमचे ग्रुप जॉईन करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लीक करून जॉईन करा. आणि अशा अनेक माहिती मिळवा.

MAHARASHTRA SPECIAL 

Telegram Chanel Join 👈 क्लिक करा .

Telegram Group Join 👈 क्लिक करा .

Whats App Group Join 👈 क्लिक करा .

विघ्नहर्ता ऑनलाईन सेवा केंद्र 

Telegram Chanel Join 👈 क्लिक करा .

Telegram Group Join 👈 क्लिक करा .

Whats App Group Join 👈 क्लिक करा .

Instagram Join 👈 क्लिक करा .

Facebook Join 👈 क्लिक करा .


Post a Comment

1 Comments

हि वेबसाईट सरकारी नसुन प्रायवेट वेबसाईट आहे. या वेबसाईटवर कोणतीही spam comment घेतली जाणार नाहीये. हि वेबसाईट पूर्णपणे सुरक्षित आहे.