'आई' मराठी निबंध Aai Marathi Nibandh - In Marathi

Aai Marathi Nibandh - In Marathi मित्रांनो तुम्हाला माहिती आहे. आई आपल्यासाठी किती कष्ट घेते. रोज पहाटे उठून सगळ्यांसाठी जेवण बनवणे. अनेक कामे करत असते. पूर्ण परिवाराची काळजी घेते. आई म्हणजे काय असते हे आपण आज बघणार आहोत. तुम्हाला नक्की आवडेल आई- मराठी निबंध अशी आशा करून मित्रांनो आपण सुरु करूया....

Aai Marathi Nibandh - In Marathi

 

Aai Marathi Nibandh - In Marathi

‘आ’ म्हणजे आत्मा, ‘ई’ म्हणजे ईश्वर. ‘आई’ या शब्दात किती मोठा अर्थ दडला आहे.  या शब्दात किती मोठा सामर्थ्य आहे. आई हा शब्द जितका छोटासा वाटतो पण या शब्दात सर्वांचेच विश्व सामावलेले आहे. माँ, मम्मा,मॉम असे कित्येक तरी शब्दांचा अर्थ मात्र तितका जिवलग आणि प्रेमळ असतो.  अस्तित्वाची लढाई हि प्रत्येकाची वेगवेगळी नक्कीच असते मात्र या लढाईत एक गोष्ट सारखी असते ती म्हणजे आई. आई आणि मुले यांच्या सारखे  गोड नाते शोधूनही सापडणार नाही. आई आपली सोबत कधीच सोडत नाही. ती नेहमी आपल्या सोबत असते.प्रत्येकाच्या आयुष्यात तिचे स्थान सर्वोच्च असते. आज आपण जे आहोत त्यात मोठा वाटा हा आपल्या आईचाच असतो. आपल्या लहानपणापासून आजअखेर आलेल्या प्रत्येक सुख दुःखाला ती समोर गेली आहे. आणि तिच्या त्या धाडसाने इथवरचा प्रवास आपण सोप्पा करत आलो आहोत. मुलांकडून कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न करता निस्सीम प्रेम करणारी जगातली एकमेव व्यक्ती म्हणजे आई. म्हणतात ना, देवाला सगळीकडे जाता येणार नाही म्हणून त्याने आई निर्माण केली.

आईसारखे दैवत साऱ्या जगतात नाही

म्हणून श्रीकाराच्या नंतर शिकणे अ आ ई

मुलांनो शिकणे अ आ ई

तीच वाढवी ती सांभाळी, ती करी सेवा तिन्ही त्रिकाळी

देवा नंतर नमवी मस्तक आईच्या पायी

आई असेल तर घराला शोभा येते. आई नसली की घर खूप सुनंसुनं वाटतं. आई सतत आपल्या मुलाच्या भविशायाचा विचार करत असते. सतत त्याच्यासाठी धडपडत असते. आपल्या मुलाला काही कमी पडायला नको याकडे तिचे लक्ष असते. स्वतःच्या ताटातली भाकरी देऊन ती उपाशी राहील पण आपल्या बाळाचे पोट भरेल. आई वात्सल्याचा झरा असतो. सर्दी, ताप असताना औषध उपचार करण्याच्या आधी मायेने कपाळावर हात फिरवताच मुलाला बर वाटतं. पहाटे सर्वात आधी उठून स्वयंपाक घरात खुडबुड करणाऱ्या आईमुळे झोपमोड होते पण जेव्हा बिछान्यातून बाहेर येऊन ब्रश केल्यावर लगेचच गरमागरम नाश्ता आणि वाफाळलेला चहाचा कप येतो तेव्हा उरल्यासुरल्या सुस्ती सोबतच चिडचिडेपणा निघून जातो. मग सुरु होते आईची धावपळ, आई अंघोळीसाठी पाणी काढ ना, आई माझे कपडे कुठेयत? डबा भरला का? मला नाही हि भाजी आवडत, बेसनची पोळी दे करून. किती ऑर्डर करतो आपण एकापाठोपाठ! पण काढिती त्रागा न करता आई सर्व फर्माईश पुरी करते. या मध्ये घरातील बाकी लोकांचेही वेगळेच आदेश असतात. आजी, आजोबा, बाबा यांच्या मागे धावावे लागते. त्यांना काय हवे नको ते पहाव लागत तेही ना थकता आणि कसलीही तक्रार न करता अगदी आनंदाने ती या गोष्टी आपल्या लोकांसाठी करत असते. कुठून आणते आई एवढा सगळा उत्साह आणि शक्ती देव जाणे!"Aai Marathi Nibandh - In Marathi"

Aai Marathi Nibandh - In Marathi

 

Aai Marathi Nibandh - In Marathi

जगात आई हीच एक देवता आहे कि जिच्याबद्दल कोणी नास्तिक नाही. वि.स.खांडेकर म्हणतात, “ आईचे मन किती वेडे असते! तिला वाटते आपल्या बाळाने लवकर मोठे व्हावे. मोठमोठे पराक्रम करावेत. विजयी वीर म्हणून सगळ्या जगात गाजावे! पण त्याचवेळी तिला वाटत असते की आपले बाळ आपल्या सावलीत सदैव सुरक्षित असावे. काळाला सुद्धा त्याच्या केसाला धक्का लावता येऊ नये.” अशा मातेचे ऋण कधी फिटेल का? छे! विनोबा भावे म्हणतात, “न ऋण फिटे”. आई या दोन अक्षरात श्रुती, स्मृती आहेत. सारी महाकाव्य आहेत. आई म्हणजे माधुर्याचा सागर आणि पावित्र्याचे आगर. फुलांची कोमलता, गंगेची पवित्रता, चंद्राची रामानीयता, सागराची अनंतता, दृष्टीची क्षमाशीलता. पाण्याची रसता जर तुम्हाला पाहायची असेल तर आईजवळ क्षणभर बस. तुम्हाला सारे मिळेल. म्हणून त्या आईची सेवा करा. मातेची सेवा करणाऱ्यांना दीर्घायुष्य, यश, स्वर्ग, कीर्ती, पुण्य, बळ, लक्ष्मी, सुख, इत्यादी प्राप्त होतात. ग.दि. माडगूळकर म्हणतात."Aai Marathi Nibandh - In Marathi"

 

Aai Marathi Nibandh - In Marathi

 
Aai Marathi Nibandh - In Marathi

यंदाचा ' आदर्श विद्यार्थी' म्हणून माझी निवड झाली, तेव्हा मला प्रकर्षाने आठवण झाली, ती माझ्या आईची ! मुख्याध्यापकांनी माझ्या गुणांचा गौरव केला, त्या सर्व गुणांची श्रेय माझ्या आईकडे जाते.

माझी आई माझ्यावर प्रेम करते; पण शेतीच्या बाबतीत एवढेच खडक आहे. शांत आणि हसतमुख असते. त्यामुळे तिचे" सुहासिनी" हे नाव तिला शोभून दिसते. माझी आई सतत काही ना काही कामात असते. झी टीव्ही वरचे निवडक कार्यक्रम पाहते; पण ते पाहता नाही तिथे काही काम चालू असते.

माझ्या आईचा दिनक्रम भल्या पहाटे सुरू होतो. आम्ही जागी होण्यापूर्वीच तिने स्वयंपाक घरातील कामे व तिची स्वतःची असतात. त्यामुळे उरलेला वेळ ते आमच्यासाठी देऊ शकते. माझ्या व माझ्या छोट्या बहिणीच्या अभ्यासाबाबत तिच्या बसते. दुपारच्या वेळी जवळच्या गरीब वस्तीत न चुकता जाते; त्यांच्या अडचणी सोडवते. तेथील स्त्रियांना लिहायला व वाचायला शिकवते.

माझी आईही कलाप्रेमी आहे. ती स्वतः उत्तम चित्र काढते आणि दुसऱ्यांच्या कलागुणांना उत्तेजन देते. आमच्यावर तिची खूप माया आहे. तिला सर्वांविषयी आपुलकी वाटते. पण माझ्यावर तिचे खरे प्रेम आहे मी खूप शिकावे असे तिला वाटते. अशा माझ्या प्रेमळ आई बद्दल माझ्या मनात नितांत आदर आहे."Aai Marathi Nibandh - In Marathi" 


मित्रांनो "Aai Marathi Nibandh - In Marathi"  हा निबंध तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. 

आमचे ग्रुप जॉईन करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लीक करून जॉईन करा. आणि अशा अनेक निबंधाचे आनंद घ्या.
 

MAHARASHTRA SPECIAL 

Telegram Chanel Join 👈 क्लिक करा .

Telegram Group Join 👈 क्लिक करा .

Whats App Group Join 👈 क्लिक करा .

विघ्नहर्ता ऑनलाईन सेवा केंद्र 

Telegram Chanel Join 👈 क्लिक करा .

Telegram Group Join 👈 क्लिक करा .

Whats App Group Join 👈 क्लिक करा .

Instagram Join 👈 क्लिक करा .

Facebook Join 👈 क्लिक करा .

 

Post a Comment

0 Comments